देशसेवेसाठी घरदार सोडून सीमेवर उभे राहणार्या जवानांचा त्याग शौर्य आणि देशप्रेमाबद्दल कृतज्ञतेची भावना कायम ठेवण्यासाठी प्रथम राष्ट्र हेच सर्वोच्च प्राधान्य असले पाहीजे आशी भावना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
अहील्यानगर तालुक्यातील घोसपुरी येथे आजी माजी सैनिकांनी एकत्रित येवून उभारलेल्या सैनिक भवनाचे तसेच गावातील कमानीचे लोकार्पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.गावचे कुलदैवत श्री पद्मावती माता मंदीर परीसराचे सुशोभीकरण अन्य विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,प्रत्येक गावातील एक तरी व्यक्ति सैन्य दलात असते सर्वस्वाचा त्याग करून देशातील सैनिक लढले म्हणून अनेक युध्द आपल्या देशाने जिंकले.अलिकडेच झालेल्या आॅपरेशन सिंदूरचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.जवान सीमेवर लढतात म्हणून आपण सुरक्षित आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहीजे.
सद्यपरिस्थितीत वाढलेल्या स्वार्थी प्रवृतीमुळे देशाप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुध्दा आठवण करून द्यावी लागते. स्वातंत्र आणि प्रजासताक दिनाच्या सुट्टीचे नियोजन करण्यात धन्यता मानली जाते आशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली.
देशसेवेसाठी योगदान देणार्या प्रत्येक जवानाचा सन्मान करणे आपली सामुहीक जबाबदारी असून घोसपुरी सारखी गाव देशभक्तीची उदाहरण असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.