ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

*सौताडा घाटात साखर घेऊन जाणारा ट्रक दरीत;एक ठार*

शेअर करा

 

पाटोदा, दि 22 जून टीम सीएमन्यूज

जामखेड पासून सात किलोमीटर अंतरावर सौताडा घाटामध्ये साखर भरलेली ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक शब्बीर पठाण वय 43 मुक्काम पोस्ट ममदापूर (पाटोदा )तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड हा जागीच ठार झाला. तर अशोक तोरडमल मुक्काम पोस्ट ममदापुर (पाटोदा) तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड वय २४ हा जखमी झाला आहे.
ट्रॅक क्रमांक एम एच ४४ ८९५५ या मधून रेणापूर शुगर कारखाना अंबाजोगाई येथून साखर घेऊन पनवेल येथे टेककेअर वेअर हाऊसला येथे घेऊन चालला होता.
सौताडा घाटामध्ये रोडचा अंदाज न आल्याने गाडी घाटात दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाली यावेळी गाडीचा चालक स्टेअरिंग मध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांचे बंधू मा.सरपंच सुनील कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावले.त्यांनी या घटनेची माहिती जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना घटनेची माहिती दिली. अडकलेल्या चालकाचा मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे आणि यांच्या मदतीने गाडीचे काही पार्ट तोडून बाहेर काढण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे यावेळी महेश मोहोळकर ,वैभव म्हेञे, असलम शेख ,दत्ता वराट आदींनी मदत केली.
मृत व्यक्तीचा पोलीस पंचनामा करून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दिले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close