ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*अबब…! एकाच दिवशी18 बाधित नगरची संख्या दोनशेच्या जवळपास*@195*

शेअर करा

 

नगर दि, 4 टीम सीएम न्यूज

Advertisement

सकाळपासून नगरच्या कोविड 19 लॅब मधून बधितांचे अहवाल बाहेर पडत आहेत .आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते. त्यानंतर जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर पडली . जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९५ इतकी झाली आहे.
जिल्हयातील अक्टिव्ह केसेस ९५ असून ,०२ जण संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत .
राहाता येथील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.काल बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील हा व्यक्ती आहे .
नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर पडली आहे . माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे कुटुंबच कोरोना बाधित झाले आहे यामध्ये 0४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे . याशिवाय, मार्केट यार्ड येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे . लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाचे वडील बाधित झाले आहेत.
ग्रामीण भागातही बाधितांची संख्या वाढत आहे .
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून बाधिताची पत्नीचाही अहवाल काल आला होता पॉजिटीव्ह आला होता. तसेच भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर -०४ (मुंबई) येथून पाथर्डी येथे आलेला ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यातील ९० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.

 

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: