क्राईमताज्या घडामोडी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आष्टी दोन लाचखोर पकडले
शेअर करा
आष्टी दि 17 डिसेंबर प्रतिनिधी
लाचखोर आष्टी येथील सहायक निबंधक संस्थां नोंदणी कार्यालयात दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात लाच घेताना पकडले.ही कारवाई बीडच्या ACB कार्यालयाने केली.
आष्टी येथील पंचायत समितीच्या समोर असलेल्या सहायक निबंधक संस्था नोंदणी या कार्यालयात असिस्टंट रजिस्ट्रार वाघमारे आणि महिला लिपीकेस सहा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
संस्थेची नोंदणी करण्यासाठी 7 हजार रुपयांची मागणी तक्रारदार व्यक्ती कडे मागितली होती.
Acb कार्यालयाने या
कार्यालयात सापळा लावला असता हे दोघे अलगद त्यामध्ये अडकले.
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील आणि पोलीस निरीक्षक पाडवी यांनी ही कारवाई केली.
2 Comments