ताज्या घडामोडीमराठवाडा

*चेकपोस्ट वरून ड्युटी करून परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू*

शिरुर तालुक्यातील घटना

शेअर करा

 

शिरुर दि 15 जून टीम सीएम न्यूज

टाटा सूमो आणि स्विफ्ट कारचा समोरासमोर अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला.ही घटना रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगांव फाट्याजवळ दि 14 रोजी रात्री उशिरा घडली. यामध्ये मृत झालेले व्यक्ती हे शिक्षक असून ते मानूर येथील चेक पोस्ट वरील ड्युटी संपवून घरी परतत होते. कोरोनाच्या काळात शिक्षकांना जिल्ह्यातील विविध चेक पोस्ट वर ड्युटी लावण्यात आल्या आहेत.

रायमोह ते शिरूर रस्त्यावर रात्री उशिरा टाटा सूमो आणि स्विफ्ट यांचा अपघात झाला.या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत असणारे मात्र,सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात प्रतिनियुक्तीवर असणारे प्रशांत डी.कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले.हा अपघात इतका जोरात होता की कुलकर्णी जागीच ठार झाले. तर तीन जण जबर जखमी झाले आहेत.जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.जखमींना शिरूर पोलीस ठाण्याचे जमादार अशोक शेळके यांनी घटनास्थळी तात्काळ जावून जखमींना बीड येथील रुग्नालयात हलवले आणि पाटोदा पोलिसांना माहिती दिली.पाटोदा पोलिस ठाण्याचे पो.शि.माने घटनास्थळी दाखल झाल्या नंतर त्यांनी पंचनामा करुन मयताचे शव शवविच्छेदनासाठी रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक होते मानुरच्या चेक पोस्टवर कार्यरत

या अपघातात ठार झालेले शिक्षक बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानुर येथील चेक पोस्टवर कार्यरत होते.7.30 वाजता आपली ड्यूटी संपल्यानंतर ते आपल्या स्विफ्ट कारणे बीड येथे आपल्या घरी निघाले होते.रसत्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.चेक पोस्टवरील आजची त्यांची ड्यूटी शेवटची असल्याचे समजते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close