ताज्या घडामोडी

*बीड जिल्ह्यात दिवसभरात 5 आणखी बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या साठीच्या घरात @61*

शेअर करा

 

बीड दि 28 मे टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .आज आणखी 5 बाधितांची भर पडून संख्या 61 इतकी झाली आहे .अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे . 5 नवीन रुग्णांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातील एकूण संख्या साठ च्या पुढे गेली आहे .

कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 41 व्यक्तीचे थ्रोट स्वब लातूर येथे पाठविण्यात आले होते. त्यातील 36 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 5 जणांचे अहवाल पझिटिव्ह आले आहेत .यामध्ये पाटोदा शहरातील एक धारूर मधील एक आणि कारेगाव तालुका पाटोदा येथील 3 जणांचा समावेश आहे .यापूर्वी कारेगाव येथे एक कोरोना बाधित आढळून आला होता ,आता त्याच गावात पुन्हा तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .त्यामुळे याचा संसर्ग वाढल्याचे दिसत आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close