ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

*महाड ‘तारिक गार्डन’ इमारत दुर्घटनेच्या बचाव कार्यात बीडच्या ‘किशोर’ची कौतुकास्पद कामगिरी*

शेअर करा

महाड दि 27,प्रतिनिधी

महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळली,आणि जेसीबीचे कंत्राटदार सचिन आघाव यांना फोन आला की इमारत पडली आहे तात्काळ जेसीबी घेऊन या…
आघाव यांनी आपल्या जेसीबी चालक किशोर ला पाठवले.
इमारत कोसळल्यानंतर नागरिकांची ,प्रशासनाची पळापळ सुरू होती,किशोर आपला जेसीबी घेऊन तेथे पोहचला आणि किशोरचे काम सुरू झाले.तीन दिवस हे काम सुरू होते,इमारतीचे मटेरियल बाजूला सारून त्याखाली दबलेल्या माणसांना शोधण्याचे काम सुरू होते .किशोर वय वर्षे 24 वर्षे आपले काम प्रामाणिक पणे करत हॊता तब्बल सलग 36 तास जेसीबी चालवून इमारती खाली दबलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचाव आणि शोध कार्य करणाऱ्या पथका समवेत काम केले.शेवटचा व्यक्ती बाहेर काढेपर्यंत किशोरचे काम अविरत सुरू होते.
सलग तासोनतास काम करताना खूप कष्ट घ्यावे लागतात. किशोरने आपल्या शारीरिक गरजा दूर ठेवत ,न थकता ,न खाता अहोरात्र काम केले.

किशोर भागवत लोखंडे मूळचा बीड जिल्ह्यातील लिंबादेवी तालुका पाटोदा येथील.अवघा दहावीपर्यंत शिक्षण झालेला किशोर कामासाठी हेल्पर म्हणून महाड येथे काम करण्यासाठी गेला आणि कष्ट करून शिकून तो जेसीबी, पोकलॅण्ड चालक बनला .त्याने केलेल्या बचाव कामामुळे किशोर चर्चेत आला.
याबाबत माहिती देताना सचिन आघाव यांनी सांगितले की, किशोर गेल्या 2017 पासून माझ्याकडे काम करत आहे.सुरुवातीला हेल्पर म्हणून काम करणारा किशोर आमचा जेसीबीचा चालक सोडून गेल्यानंतर त्याच्याकडे ही जवाबदारी देण्यात आली.तेंव्हापासून किशोर कष्ट घेत आहे.अहोरात्र काम करण्याची त्यांची नेहमी तयारी असते.घटना घडण्यापूर्वी किशोर दुसऱ्या कामावर सलग 12 तास काम करून आला होता,त्याला पाठविलेला जेवणाचा डबा तसाच जेसीबी मध्ये होता.” आघाव सांगत होते , तरीही इमारत पडल्यानंतर न थांबता काम करत राहिला.
अशा घटनांमध्ये जेसीबी चालकाचे कौशल्य पणाला लागत असते.अतिशय काळजीपूर्वक पडलेल्या ढिगारा बाजूला सारुन शोध कार्याला मदत करावे लागत होते.जितके महत्त्वाचे काम NDRF चे होते तितकेच महत्त्वाचे काम किशोरने केले आहे.त्यामुळेच किशोर बचाव कार्यातील हिरो ठरला आहे.या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले.

हेही वाचा:आज बीड जिल्ह्यात 51बाधितांची भर

किशोरच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने त्याचे कौतुक केले असून बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी किशोरची फोनवरून माहिती घेऊन त्याचे कौतुक केले आहे.
कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने केल्यास आपणही त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो हे बीडच्या किशोर ने दाखवून दिले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close