कृषीवार्ताताज्या घडामोडी

Agri-university- *सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कृषि विद्यापीठ कर्मचार्यांचे 20 मार्चला धरणे आंदोलन*

शेअर करा

राहुरी दि. 11 मार्च। टीम सीएमन्यूज

 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसाठी दि. 20 मार्च, 2020 रोजी कृषि विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. या विषयाचे निवेदन त्यांनी नुकतेच विद्यापीठाचे कुलसचिवांना दिले आहे.

कृषि विद्यापीठ परिनियम 1990 अन्वये नियम क्र. 138 नुसार राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे कृषि विद्यापीठ सेवेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियम व सेवा शर्ती जशास तशा लागू आहेत. परंतु कृषि विद्यापीठ सेवेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असल्याने महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने दि. 26 फेब्रुवारी, 2020 रोजी बोलविण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या बैठकीमध्ये आंदोलन करणेबाबत एकमताने ठराव पारित करण्यात आलेला आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने दिलेल्या निवेदनानुसार कृषि विद्यापीठ सेवेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दि. 20 मार्च, 2020 रोजी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एकत्र जमुन काळ्या फिती लावून, मोर्चाने जावून निवेदन सादर करुन धरणे आंदोलन करतील. तसेच मध्यवर्ती परिसराबाहेरील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्या त्या मुख्यालयासमोर एकत्र जमुन काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करतील. तसेच सातवा वेतन आयोगाचा शासन निर्णय निर्गमीत होईपर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निषेद म्हणुन काळ्या फिती लावून काम करतील.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकार्यांचे सह्या असलेले अशा प्रकारचे निवेदन मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच सर्व प्रमुख मंत्री, विरोधी पक्ष नेते, मा. आमदार, मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मा. महासंचालक, कृषि परिषद, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विभाग प्रमुख अशा सर्वांना पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close