कृषीवार्तामहाराष्ट्र

कृषि मंत्र्यांची कृषि विद्यापीठास भेट विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदित होतात – कृषि मंत्री दादाजी भुसे

शेअर करा

 

राहुरी , दि. 7 डिसेंबर, 2020

कृषि मंत्री दादाजी भुसे आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत कुलगुरु डॉ. अशोक ढवण, राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पवार, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव श्री. मोहन वाघ उपस्थित होते.

कृषि मंत्री

विद्यापीठातील फॉरेज कॅक्टस प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, बांबु संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, कृषि अवजारे प्रकल्प, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान प्रकल्पास भेट दिली.

या भेटी दरम्यान मंत्री म्हणाले विद्यापीठ स्थापन होऊन 52 वर्ष झाले असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान अनेक शेतकर्यांपर्यंत पोहचले आहे. बांबु प्रकल्पास भेट देतांना ते म्हणाले 1995 साली बांबु लागवडीचे मिशन हे शेतकर्यांनी सुरु केले होते. पालघरच्या आदिवाशी भगिनींचे बांबु प्रक्रियेवर चांगले काम केलेले आहे. कृषि अवजारे प्रकल्पाला भेट देतांनी ते म्हणाले विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर कृषि अवजारांची निर्मिती करणे गरजेचे आहे. शासन फळ लागवडीला प्रोत्साहन देत आहे पण उत्पादित फळांच्या मुल्यवर्धनावर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदी होतात हे विद्यापीठातील डाळिंब आणि ऊस संशोधनाने अधोरेखीत केलेले आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे , नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी. रफिक नाईकवाडी, सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप, विभाग प्रमुख श्रीमंत रणपिसे, आनंद सोळंके यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्र प्रकल्पाच्या भेटीच्या वेळी श्री. पोपटराव पवार माहिती देतांना म्हणाले विद्यापीठाच्या 953 हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प आदर्शवत असून या प्रकल्पाद्वारे 123 टी.सी.एम. पाण्याची साठवणूक जमिनीत झालेली आहे. या प्रकल्पामुळे या प्रक्षेत्रावर कर्बाचे प्रमाण किती वाढले, मातीची सुपीकता, जमिनीची सुधारणा या संदर्भात अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प देशासाठी आदर्शवत प्रकल्प असून हा संपूर्ण देशात राबविणे गरजेचे आहे. या भेटीच्या वेळी डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ. सचिन नांदगुडे, प्रा. प्रसन्न सुराणा, डॉ. बाबासाहेब सिनारे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. विक्रम कड, डॉ. सुमती दिघे, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. अनिल काळे, प्रा. मंजाबापू गावडे आणि डॉ. अशोक वाळूंज यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.

हेही :बिबट्याचा हल्ल्यात ऊसतोडणी कामगारांची मुलगी ठार

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close