*अफूच्या शेतावर पोलिसांची धाड..कुठं?*.
*अफूच्या शेतावर पोलिसांची धाड..कुठं?*.

हिंगोली, दि 7/टीम सीएमन्यूज

हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवारात एका शेतात अफूची लागवड केल्याचे दिसून आले. कांदा -लसणाच्या शेतामध्ये अफूचे सहाशे ते सातशे झाडे लावण्यात आली होती. आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या पथकाने या शेतात छापा टाकून अफूची झाडे जप्त केली आहेत. झाडे जप्त करून ते पोलिस ठाण्यात आणले आहेत .सदर शेतकऱ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे .अफूच्या शेतीच्या बातमीने कळमनुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे मोठ्या प्रमाणावर अफूची शेती उघडकीस आली होती .

Share this story