*ऊसामध्ये पाचटाचे मुलस्थानी संवर्धन करा-कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा*
*ऊसामध्ये पाचटाचे मुलस्थानी संवर्धन करा-कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा*

 

राहुरी दि,17 जून टीमसीएम न्यूज

ठिबक सिंचन पध्दतीचा तसेच आंतर पिकाचा अवलंब ऊसामध्ये करणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये ऊसाचे पाचट न जाळता तेथेच मुलस्थानी शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन केले तर जमिनीतील कर्ब वाढून जमिनीचा पोत सुधारतो. ऊसाचे पाचट न जाळता त्याचे मुलस्थानी संवर्धन करण्याची कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी आवाहन केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्प आणि वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बदलत्या हवामानात शाश्वत, विक्रमी ऊस उत्पादनासाठी जमीन सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्य, रोग आणि कीड व्यवस्थापन या तीन दिवसीय ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण समारोप प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा बोलत होते. या प्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे महासंचालक श्री. शिवाजीराव देशमुख, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक, श्री. विकास देशमुख हे उपस्थित होते.
श्री. शिवाजीराव देशमुख म्हणाले शास्त्रोक्त पध्दतीने क्षारपड जमीन व्यवस्थापन करण्यासाठी व्ही.एस. आय. सदैव महात्मा फुले कृषि विद्यापीठासोबत आहे. श्री. विकास देशमुख यांनी बदलत्या हवामानात माती परिक्षण आधारावर खतांचे नियोजन या विषयी मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध तज्ञांनी तसेच ऊस उत्पादक प्रगतीशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये 1364 शेतकरी, 169 कृषि विभागाचे अधिकारी व साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी आणि 67 कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी प्रशिक्षित केले. कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रकल्पाची माहिती तर प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा प्रशिक्षणाचे आयोजक सचिव डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी सादर केला. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. प्रीती देशमुख, डॉ. भरत रासकर, डॉ. अनिल चिंचमालातपुरे, डॉ. योगेश थोरात, सौ. सुधा घोडके, डॉ. जमदग्री आणि कृषिभूषण श्री. संजीव माने हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. सुनिल थोरात, डॉ. नीलम कोंंडविलकर, डॉ. रोहित सोनवणे आणि इंजि. मोहसीन तांबोळी यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.

Share this story