Tuesday, October 22, 2024

आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

अहिल्यानगर दि. १८-

ahilyanagar model code of conduct hoardings remeoved विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या ४८ तासामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच खाजगी मालमत्तेवरील भित्तीपत्रके, घोषणा फलक, रंगविलेल्या जाहिराती, कोनशिला, झेंडे काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसरातील ११ हजार ६४१, सार्वजनिक ठिकाणच्या ९ हजार ५०२ तर खाजगी मालमत्तेवरील ३ हजार ८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

संगमनेर मतदारसंघ कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ८८, खाजगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ६४१, खाजगी मालमत्तेवरील ३५१, कोपरगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ९५४, सार्वजनिक ठिकाण ६१९, खाजगी मालमत्तेवरील ३०९, श्रीरामपूर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १३१, सार्वजनिक ठिकाण १ हजार ५५० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

नेवासा मतदारसंघ कार्यालय परिसर ३२४, सार्वजनिक ठिकाण ५७७, शेवगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ८५४, सार्वजनिक ठिकाण ९३७, खाजगी मालमत्तेवरील १ हजार ७२३, राहुरी मतदारसंघ कार्यालय परिसर २५४, सार्वजनिक ठिकाण १४१, खाजगी मालमत्तेवरील २१, पारनेर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १२३, सार्वजनिक ठिकाण ९७८, खाजगी मालमत्तेवरील ४९५ जाहिराती काढण्यात आल्या.

अहमदनगर शहर मतदारसंघ कार्यालय परिसर २८६, सार्वजनिक ठिकाण ४१६, खाजगी मालमत्तेवरील ४१, श्रीगोंदा मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार २९४, सार्वजनिक ठिकाण ८०२, खाजगी मालमत्तेवरील ३११ तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८२५, सार्वजनिक ठिकाणच्या ३६२ जाहिराती काढण्यात आल्या असल्याचे आचारसंहिता कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles