Thursday, January 29, 2026
Homeअहिल्यानगर महापालिका निवडणूकमहायुतीचे 5 नगरसेवक बिनविरोध ; 283 उमेदवार रिंगणात

महायुतीचे 5 नगरसेवक बिनविरोध ; 283 उमेदवार रिंगणात

अहिल्यानगर

Ahilyanagar municipal election 5 unopposed महानगरपालिकेच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 194 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.आता 17 प्रभागामध्ये 283 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती आहे. तर शिवसेना ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाच प्रभागातील महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग क्रमांक सातमधून पुष्पा अनिल बोरुडे, तर प्रभाग क्रमांक सहा मधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)नेही निवडणुकीत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अशी माहिती विविध प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments