आरोग्यताज्या घडामोडी

अहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

शेअर करा

 

*

अहमदनगर दि ११ प्रतिनिधी

जिल्ह्यात आज १३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८०६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४२ आणि अँटीजेन चाचणीत १० रुग्ण बाधीत आढळले.(८३ )

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, पारनेर ०३, पाथर्डी ०३, संगमनेर ०३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०९, पारनेर ०३, राहाता ०२, राहुरी ०२, संगमनेर ०८ आणि जिल्हा बाहेरील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.(८३ )

अँटीजेन चाचणीत आज १० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०५, नगर ग्रामीण ०२, राहुरी ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.(८३ )

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा १७, अकोले ०५, कोपरगाव १०, नगर ग्रामीण १२, नेवासा ०१, पारनेर ०६, पाथर्डी ०३, राहाता ०२, राहुरी ०३, संगमनेर ११, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०७ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६८३३३*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ८०६*

*मृत्यू:१०६७*

*एकूण रूग्ण संख्या:७०२०६*

हेही वाचा :त्या ९ गावात कोंबड्याच्या खरेदी विक्री वर बंदी 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close