Ahmednagar-corona- *कोरोना विलगीकरण कक्षात चार जण;16 जणांचे थुंकीचे नमुने NIV ला पाठविले*
नगर दि .14 मार्च । टीम सीएमन्यूज
कोरोना बाधित एक आणि अन्य तीन जणांना
विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून 12 जणांना त्यांच्या घरी निगराणी खाली ठेवण्यात आली असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहमदनगर मध्ये दुबईवरून आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील असलेल्या चार जणांचा तर दूरच संपर्कातील असलेले चार जण ,इटलीहून आलेला एक जण व त्याच्या संपर्कातील तीन जण आणि स्वतःहून दाखल झालेले चार अशा एकूण सोळा जणांच्या थुंकीचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहे.
कोरोना बाधित रुग्णाला सर्दी ,खोकला असा त्रास नसून त्याची प्रकृती ठणठणीत आहे .त्याला बूथ हॉस्पिटल मधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित तीन जण जिल्हा रुग्णालयात असून 12 जणांना त्यांच्या घरी निगराणी खाली ठेवण्यात आले आहे .नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलं आहे.