आरोग्यताज्या घडामोडी

अहमदनगर १७० रूग्णांना डिस्चार्ज तर ९९ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

शेअर करा

अहमदनगर १७० रूग्णांना डिस्चार्ज तर ९९ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर दि 2 जानेवारी।प्रतिनिधी

जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार २२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०१३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६ आणि अँटीजेन चाचणीत १४ रुग्ण बाधीत आढळले.

आणखी वाचा:बीड जिल्ह्यात 44 कोरोना बाधित सर्वाधिक आष्टीत 16

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ०६, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०३, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८,अकोले ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०३, पारनेर ०८, राहाता ०४, संगमनेर ०४, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कर्जत ०२, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ४५, अकोले ०५, जामखेड ०१, कर्जत ०५, कोपरगाव १६,, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२, पारनेर ०६, पाथर्डी १९, राहाता १५, राहुरी ०३, संगमनेर २०, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०२, श्रीरामपुर ०६, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि जिल्हा बाहेरील ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६७२२६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १०१३*

*मृत्यू:१०४८*

*एकूण रूग्ण संख्या:६९२८७*

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close