ताज्या घडामोडीशैक्षणिक

*राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात अहमदनगर जिल्ह्याची हट्रिक*

शेअर करा

अहमदनगर दि 21 प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून सलग तिसर्यांदा अहमदनगर जिल्ह्याला  हा पुरस्कार मिळाला आहे.गोपाळवाडी-चेडगाव तालुका राहुरी येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना जाहीर झाला आहे.त्यामुळे पुरस्काराची  हॅट्ट्रिक झाली आहे.

यासंदर्भात केंद्रीय शिक्षण  मंत्रालयाने हे पुरस्कार जाहीर केले. राज्यात दोन पुरस्कार मिळाले असून अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी-चेडगाव तालुका राहुरी येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना जाहीर झाला आहे. तर मुंबईतून भाभा अटॉमीक  शक्ती केंद्र अणुशक्तीनगर येथील अटॉमीक एनर्जी  सेन्ट्रल स्कुल नंबर 4 या शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना जाहीर झाला आहे.
देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि 7 संस्थेच्या एकूण 153 शिक्षकांमधून ही निवड करण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरवर्षी  5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरीत केला जातो.यापूर्वी पहिल्या वर्षी कर्जत तालुक्यातील विक्रम अडसूळ यांना दुसऱ्या वर्षी अहमदनगर येथील डॉ अमोल बागुल यांना आणि तिसऱ्या वर्षी नारायण मंगलारम यांना जाहीर झाला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close