ताज्या घडामोडी
Trending

*नगरचा कोहिनुर ‘हिरा’ निखळला*

शेअर करा

अहमदनगरचे व्यापारी दृष्टितकोनातून नाव उज्वल करणारे म्हणून ज्यांची ओळख होती ते कोहिनुर क्लॉथचे सर्वेसर्वा प्रदीप गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .त्यांचे वय 65 इतके होते .त्यांच्या निधनाने अहमदनगर शहराची मोठी हानी झाली आहे.शहराचे वैभव वाढविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.शहराचे पर्यटन सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने विकास झाला पाहिजे यासाठी परखड मत व्यक्त कारण्यांपैकी असलेले प्रदीप गांधी काळाच्या पडद्याआड गेले आहेत .त्यांच्या आत्म्यास शांती लाभो .

संपादक

कोहिनुर चे प्रदीप गांधी यांच्या बद्दलच्या आठवणी शब्दगंध साहित्यीक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी जागृत केल्या असून शब्दांकन भगवान राऊत यांनी केले आहे.

“कपडे खरेदीचा विषय निघाला की सर्वांच्या ओठांवर पटकन येणारे नावं म्हणजे कोहिनुर. गेल्या ५० वर्षांपासून कोहिनुर वस्त्र दालन ग्राहकांच्या सेवेत विनम्रपणे सज्ज आहे. कपड्यांसाठी विश्वसनीय नाव ग्राहकांच्या मनात कायम कोरले गेले आहे. विनम्र व सस्मित सेवा ही जशी कोहिनुर ची खासियत आहे. त्यात कोहिनुर चे मालक प्रदीपशेठ गांधी यांच्या सिंहाचा वाटा आहे.

एवढ्या मोठ्या वस्त्र दालनाचे मालक व एक यशस्वी उद्योजक असून देखील आपल्या मोठेपणाचा, श्रीमंतीचा, ऐश्वर्याचा अजिबात बडेजाव न करता, सर्व ग्राहकांशी सुहास्य वदनाने संवाद साधणारे, प्रत्येकाच्या आवडी निवडी लक्षात ठेवणारे आणि आलेल्या ग्राहकांशी अत्यंत आपुलकीने वागणारे प्रदीपशेठ अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.सर्व सामान्य ग्राहकांपासून व्यापारी, साहित्यिक, उद्योजक व सेलिब्रिटीज असे सर्व स्तरातील ग्राहक वर्षातून एकदा का होईना. कोहिनुर वस्त्र दालनाला आवर्जून भेट देतात. कपड्यांचे शौकीन असलेले ग्राहक प्रदीपशेठ यांच्या नजरेतून कधीच सुटू शकत नसायचे. एकदा त्यांनी अशा प्रकारचा कपड्यांचा शौक असलेला ग्राहक हेरला की त्यांच्याशी त्यांचे कायम स्वरूपी जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हायचं.

गेल्या २५ वर्षांपासून मी कोहिनुर मधून नियमितपणे कपडे खरेदी करतो. कमी गर्दी असतांना, शक्यतो दिवाळीच्या आधी मी कोहिनुर मध्ये कपडे खरेदी करतो. माझ्या आवडी निवडी प्रदीपशेठ यांना माहीत होत्या. त्यामुळे मी कोहिनुर मध्ये जेव्हा खरेदी करायला जायचो, तेव्हा ते माझ्या साठी स्पेशल कपड्याचे तागे राखून ठेवलेले असत. किंवा एखाद्या नवीन ब्रँड चे कापड आले तर माझ्यासाठी वेगळे ठेवले जात. सेल्समन ला तशा सूचना ते द्यायचे .

केवळ एक व्यापारी म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे स्वतंत्र नावलौकिक मिळवला. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी नगर शहरातील अनेक गोर गरीब कलावंतांना अन्नधान्य व किराणा वाटप केले. कोहिनूरच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून नगर शहरातील २०० होतकरू तरुणांना त्यांनी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर नगर शहराच्या सर्वांगीण विकासास पूरक असणाऱ्या विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांना ते नेहमीच सहकार्य करत असत. नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंची जपवणूक, स्वछता किंवा सुशोभीकरण असो कोहिनुर चा त्यात मोलाचा सहभाग असतो. नगर शहराने आपल्याला नावलौकिक, पैसा, प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे कापड  उद्योगक्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून कोहिनुर वस्त्र दालन नगरच्या बाजारपेठेत दिमाखात उभे आहे. नगर शहर व जिल्ह्याच्या आर्थिक उलढालीतही कोहिनुर चा मोलाचा वाटा आहे. आपण या शहराचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून त्यांचे शहराच्या भल्यासाठी सतत नवनवीन उपक्रम ते हाती घेत असायचे.

कोरोनाचे संकट सर्व जगावर आहे. या संकटावर मात करावी लागणार आहे. यापुढे कोरोना सोबतच जीवन जगण्याची लढाई लढावी लागणार आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर लॉक डाऊनचे सर्व नियम पाळून, तसेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे हे सर्व नियम पाळून सर्व व्यवसाय करावे लागणार आहेत. त्याच पध्दतीने कोहिनुर चा व्यवसाय सुरू होता. परंतु सर्व काळजी घेऊन देखील तिथे काम करणाऱ्या कामगारांना कोरोना चा संसर्ग झाला.त्यामुळे त्यांनी कोहिनुर काही काळ बंद ठेवले.
आज ते आपल्यात नाहीत पण कोहिनुर च्या रूपाने त्यांच हे ऋण अहमदनगरकर कधीच विसरणार नाही .
त्यांना विनम्र अभिवादन

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close