fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

Ambad- *रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन*

शेअर करा

 

अंबड दि 16 मार्च ,टीम सीएमन्यूज

अत्यंत खराब रस्ता मार्ग क्रमांक 20

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील थेरगाव ते टाकळी अंबड यासह पैठण तालुक्यातील
विहामांडवा परिसरातील अपूर्ण रस्ते पूर्ण करावेत या मागणीसाठी नागरिकांनी
टाकळी अंबड येथे विहामांडवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर यांनी प्रधान मंत्री ग्राम सडक योजना मार्ग क्रमांक 20 पूर्ण न केल्याबद्दल या विभागाचे कार्यकारी अभियंता बाविस्कर आणि राजपूत इंजिनियर यांना धारेवर धरले.
टाकळी येथे या रास्तारोकोसाठी अनेक नागरिक उपस्थित होते . यावेळी पोलीस उपनिरीक्षक खरड आणि पोलीस उपनिरीक्षक धांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी टाकळी वाळवा परिसरातील सर्व नागरिकांनी रस्ता झालाच पाहिजे म्हणून घोषणा दिल्या आणि आंदोलनही केले. या प्रसंगी वाकडे गुरुजी,  पञकार नरके सर,  ईश्वर वाकडे, गजानन तुपकरी,  शिवनाथ पाटील गाभुड,  सराफ,  पैठणे,  येवले,  गोर्डे,  नरके,  ईतर गावकरी टाकळी अंबड परिसरातील सर्व नागरिकांनी रस्ता झालाच पाहिजे म्हणून आंदोलनात सहभागी झाले.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close