ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यातील शहीद सैनिकाचा आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शेअर करा

अमरावती जिल्ह्यातील शहीद सैनिकाचा आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अमरावती दि 27 डिसेंबर/प्रतिनिधी

भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कैलास दहिकर या जवानाचा कुलू-मनाली परिसरातील पॉइंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत होरपळून त्यांना वीरमरण आले. ते अचलपूर तालुक्यातील पिंपळखुंटा येथील रहिवाशी होते. त्यांच्यामागे पत्नी, दीड वर्षाची मुलगी व आप्तपरिवार आहे.
आज शहीद जवानांवर त्यांच्या पिंपळखुटा या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर,शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू,खासदार नवनित राणा, प्रशासकीय अधिकारी, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय सैन्यदल,राज्य पोलीसदल आणि माजी सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली.

कैलास कालू दहिकर हे 27 वर्षीय जवान भारतीय सैन्यात ‘15 बिहार’रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. दि. 23 डिसेंबरच्या रात्री हिमाचलप्रदेशातील कुलू-मनाली येथे कर्तव्यावर असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी रात्री केरोसिनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. ते झोपेत असताना आग लागून होरपळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. श्री. दहिकर यांच्या मृत्यूनंतर आवश्यक ते सोपस्कार आटोपून आज सकाळी त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने आणले. त्यानंतर सैन्याच्या वाहनातून पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले.

हेही वाचा:नक्षलवादयांचे अयशस्वी प्रयत्न;150 जिलेटिन, 27 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरसह 20 किलो स्फोटके जप्त

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close