ताज्या घडामोडीमराठवाडा

*आणि स्कॉर्पिओ गाडीसह तिघे विहिरीत कोसळले!*

शेअर करा

कडा दि 13 जून टीम सीएमन्यूज

रात्रीची वेळ. ते कड्याकडे येत होते पण अचानक गाडीचा लाईट बंद झाला आणि गाडीसह तिघे  थेट विहिरीत कोसळली.ही घटना देवीनिमगावजवळ घडली.विहिरीत पडल्यानंतर कसेबसे विहिरीच्या पायऱ्याने ते वर आले.जवळून जाणाऱ्या शिक्षकाने हे पहिल्याने त्यांना मदत करत कडा येथील दवाखान्यात दाखल केले.

धामणगाव कडा रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाघळूज तालुका आष्टी येथील तिघे जण जालना येथून आपल्या गावी परतत असताना हा अपघात घडला.नितीन अशोक गुंड, करण राजू पवार आणि बालू शहादेव गुंड हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. देविनिमगाव गावापासून कड्याकडे जाताना रस्त्याच्या बाजूला ही विहीर आहे.हि विहीर पन्नास फुट खोल असून विहिरीच्या कठड्यावर झाडे झुडुपे उगवली आहेत.गाडी विहिरीत पडल्याचा अंदाज येत नाही. गाडी विहिरीत पडल्यावर हे तिघे पायऱ्याने वर आले.त्यावेळी जवळून जात असलेले शिक्षक सचिन मार्कंडे यांनी त्यांना पाहिल्यानंतर त्यांना कडा येथील डॉ पटवा यांच्या दवाखान्यात दाखल केले. गाडीचा लाईट अचानक बंद झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: