कोंबड्यांच्या मृत्यू प्रकरणी पशुसंवर्धन विभागाच्या पथकाची शिरापूरला भेट
आष्टी दि 13 प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आज पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने शिरापूर येथे जाऊन मृत कोंबड्यांची पाहणी केली.तसेच येथील बाधित कोंबड्यांचे नमुने गोळा करून पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी दिली.
शिरापूर येथील किरण तागड यांच्या कडील कोंबड्या मेल्यानंतर या परिसरातील 7 शेतकऱ्याच्या कोंबड्या मेल्याचे उघडकीस आले.
पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त रवी सुरेवाड आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी तात्काळ दखल घेऊन आज या भागातील मरतुक पक्षांचे नमुने गोळा केले.तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.त्यांच्या पाहणी दरम्यान 7 शेतकऱ्यांच्या कोंबड्या बाधित झाल्याचे आढळून आले.
ज्या ठिकाणी कोंबड्या फेकून देण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली.
या पाहणी पथकात तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे, मंडळ अधिकारी, तलाठी, पशुधन विस्तार अधिकारी यांचा समावेश होता.
आता अहवालाची प्रतीक्षा
या मरतुक पक्षांचे आणि जिवंत बाधित पक्षांचे नमुने गोळा करून ते पुणे येथील प्रयोगशालेत पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल असे ढेरे यांनी सांगितले.
हेही वाचा :नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार 290 डोस जिल्हा परिषदेत दाखल