ताज्या घडामोडीमराठवाडा

*सिरो सर्वेक्षणात औरंगाबाद शहराच्या ११.८ टक्के नागरिकांमध्ये कोरोना विरोधी ॲंटीबॉडीज*

शेअर करा

 

औरंगाबाद दि 24 प्रतिनिधी

कोरोनाची साथ कमी होत असल्याचे लक्षात येत असले तरी ‘गाफील राहू नका, अद्याप धोका टाळला नाही’ असा इशारा देत शहराला करोनाचा विळखा कायम असल्याचे सिरो सर्वेक्षण अहवालानंतर तज्ज्ञांनी स्पष्ट केले. शहरात केलेल्या कोविड सिरो सर्वेक्षणात शहरातील ११.८१ टक्के म्हणजे १ लाख ७० हजार नागरिकांमध्ये कोविड विरोधी अँटीबॉडीज ( प्रतिद्रव्ये ) आढळून आल्या असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मास्क वापरणे, वारंवार साबण- पाण्याने हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे या उपायांची कडक अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही तसेच पुढील टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सिरो सर्वेक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा अहवाल शहराच्या लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे लोकसंख्येनुसार कोविड विरोधी ॲंटीबॉडीज आढळून आलेल्यांची संख्या १ लाख ७० हजार असू शकते हा केवळ अंदाज असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद शहरामध्ये १० ते १६ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात शहरातील सर्व ११५ वार्डांमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण ४ हजार ३२७ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचाही ३० क्लस्टर पद्धतीने अभ्यास करण्यात आला. ११.८१ टक्क्यांमध्ये झोपडपट्टीतील लोकसंख्येत हे प्रमाण १४.५६ टक्के तर इतर लोकसंख्येत १०.६४ टक्के आहे.

गणेश विशेष:दोन इंचाचा गणपती पहायचा असेल तर इथे भेट द्या

यावेळी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या की, शहरी भागात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सिल्लेखाना- नुतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, जूना बाजार, न्यायनगर, निझामगंज- संजयनगर या पाच वॉर्डामधील लोकांमध्ये सर्वाधिक प्रतिद्रव्ये आढळून आले असून जय विश्वभारती कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी – शास्त्रीनगर, संत ज्ञानेश्वरनगर या पाच वार्डांमध्ये सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के लोकांमध्ये कोविड विरोधी ॲंटीबॉडीज आढळून आले असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close