ताज्या घडामोडीमराठवाडा

ashti *आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध आष्टी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल*

शेअर करा

 

 

आष्टी दि. ३ एप्रिल टीम सीएम न्यूज

Advertisement

 

नगर जिल्ह्यातील  खेड तालुका कर्जत येथे जिल्ह्याच्या सीमा बंद असताना जाऊन शासनाच्या संचार बंदीचे आणि आपत्ती निवारण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार सुरेश धस हे दि २ रोजी रात्री आष्टीहून अहमदनगर जिल्ह्यातील खेड तालुका कर्जत येथे गेले होते. जिल्ह्यात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या व शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोना.प्रशांत क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 भादंवी सहकलम 51 (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करपे हे करीत आहेत.

 

काय केले  आ. सुरेश धस यांनी?

आ सुरेश  यांना आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथील उसतोडणी मजूर खेड येथे अडकून पडले असून त्यांना पोलिसांनी मारहाण केली असल्याची माहिती मिळाल्या नंतर ते रात्री खेड येथे पोहचले आणि दुसर्या दिवशी ही ते तिकडे गेले आणि शासनाच्या विरोधात टीका केली. त्यांनी  नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: