Ashti- *आष्टी बसस्थानकात मराठी भाषा गौरवदिन साजरा*
आष्टी दि 27 फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज
मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ असल्याचे संत ज्ञानदेवांनी वर्णन केले आहे. मराठी भाषेला मायेचा म्हणजे आईचा दर्जा मिळालेला आहे. माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या सळसळत्या असल्यामुळे माणूस जीवंत राहतो त्याप्रमाणे समाजाला जीवंत ठेवण्यासाठी आपली बोलीभाषा असलेली मराठी भाषा रक्त वाहिन्याप्रमाणे सळसळती असावी असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्ञबुध्दे यांनी केले.
आष्टी येथे राज्य परिवहन महामंडळ आगाराद्वारे आज बस स्थानकावर मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
सहस्ञबुध्दे पुढे म्हणाले की, कवी सुरेश भट यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्यामुळे धन्य झालो आहोत.मराठी भाषा ही आमची आई असल्याने सर्व भारतीय नागरिक बंधुभावाने धर्म,पंथ,आणि जातपात विसरून सुखाने नांदत आहोत.
आष्टी आगाराचे आगर प्रमुख संतोष डोके यांचे खास आभार मानताना ते म्हणाले की, मराठी भाषा शिकवणाऱ्या शाळा महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेचा गौरवदिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावयाला पाहिजे परंतु त्यापेक्षा आपण प्रवाशांसमवेत बस स्थानकावर गौरवदिन साजरा केला आहे ही विशेष बाब आहे असे सांगितले.
यावेळी आगार प्रमुख संतोष डोके,पत्रकार उत्तम बोडखे ,बापुराव गुरव प्रविण पोकळे,शेख सलीमभाई ,शरद खोत,संजय निंबाळकर,सचिन काळे,हनुमंत परदेशी,श्याम कुलकर्णी, नंदकुमार जाधव, विकास डोंगरे, महेश कर्डीले,अविनाश देशमुख यांच्यासह अनेक कर्मचारी ,प्रवासी उपस्थित होते. उपस्थितांचे आगारप्रमुख डोके यांनी आभार मानले.