ताज्या घडामोडीमराठवाडा

Ashti- *इतिहासात महिलांनी शौर्य गाजवत इतिहास घडविला आहे -सौ.प्राजक्ताताई धस* महिलादिनानिमित्ताने अनेक उपक्रमशील कार्यक्रम

शेअर करा

आष्टी,दि 7 । टीम सीएमन्यूज
जेव्हा जेव्हा महिलांनी इतिहास घडवला तेव्हा काय त्यांच्या पाया खाली पायघड्या हांतरलेल्या नव्हत्या. त्यांची वाट काटेरीच होती. त्या त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या कणखरपणे चालल्या. जी आपली महिलांची ओळख आहे त्यांनी जपली. त्यांचाच आदर्श घेऊन आपण हा महिला दिन साजरा करत आहोत व केला पाहिजे.महिलांनी इतिहासात अनेक शौर्य गाजवत इतिहास घडविला आहे. तसे पाहिले तर ३६५ दिवस महिलादिन साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली महिलादिनानिमित्त प्रास्ताविक भाषणात प्राजक्ताताई धस यांनी व्यक्त केले.

 

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष संगीता विटकर,उपनगराध्यक्षा पंखाबाई रेडेकर,आशाताई धोंडे,सुजाता झरेकर, प्रियंका होणकसे, वाल्हेकर, मुरकुटे, शकुंतला सुरवसे महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.पुढे बोलताना प्राजक्ताताई धस म्हणाल्या, की,अनेक क्षेत्रात महिलांनी काम केले आहेत. जिजाबाई, सावित्रीबाई,अहिल्याबाई, चांदबीबी, इंदिरा गांधी अशा अनेक थोर महिलांनी इतिहास घालविला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल करण्याची ताकद महिला मध्येच आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी महिलांनी पुढे घेऊन गेले पाहिजेत. या बरोबर आरोग्याकडे देखील महिलांनी लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल कुटुंबातील व्यक्तींची काळजी करण्याबरोबर आपल्या आरोग्याकडे महिला दुर्लक्ष करत आहेत.महिलादिनाचे औचित्य साधून आम्ही महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे आयोजन केले आहे.


यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर महिला सरस्वती, जिजाऊ, सावित्रीबाई, रमाबाई या थोर महिलांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतच्या अनेक विकास कामाचा चित्रपटफीत दाखवण्यात आली. या चित्रफितेत नगराध्यक्ष भारत मुरकुटे यांनी सविस्तर विकास कामाचे मार्गदर्शन केले आहे.स्त्रीभुण हत्या, हुंडाबळी, स्त्रीवरील अत्याचार या गोष्टीचे यावेळी महिलांना प्रतिज्ञा घेतली.विद्यमान टीव्हीफेम निलेश पापत यांचा  हा खेळ पैठणीचा होम मिनीस्टर हा कार्यक्रमाने अनेक खेळ खेळविण्यात आले व या कार्यक्रमाने महिलांचे मनोरंजन व उत्कृष्ट प्रतिसाद देऊन महिलांनी या स्पर्धेत यावेळी भाग घेतला.
यावेळी या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.काथवटे व सुनीता उगले यांनी केले तर आभार प्राजक्ता ताई धस यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close