ताज्या घडामोडीमराठवाडा

Ashti- *कोरोना नियंत्रण साधन सामुग्री साठी 50 लाखांचा निधी-आ.बाळासाहेब आजबे*

शेअर करा

 

 

कडा,दि 1 एप्रिल टीम सीएमन्यूज

कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी आष्टीचे आ बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये खर्चास मंजुरी देण्याचे पत्र बीड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोविड १९ अर्थात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत . संचारबंदी ही त्यापैकी एक . या काळात लोकांची अन्नधान्य बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत . ठिकठिकाणी गरजूंना किराणा व इतर साहित्य वाटप केले जात आहे. आ बाळासाहेब आजबे यांनी आधी आष्टी , पाटोदा आणि शिरूर येथील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना सुयोग्य व्यवस्थापनाच्या सूचना केल्या. आता त्यापुढे जाऊन त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून बीड जिल्ह्यातील जनतेसाठी कोरोना प्रतिबंधक वैद्यकीय यंत्र सामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे पत्र बीड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close