ताज्या घडामोडीमराठवाडा

Ashti *राज्य सरकारने ऊसतोड कामगार , भूमीहिन ,शेतमजूर,यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे-मा.आ. भीमराव धोंडे*

शेअर करा

आष्टी,दि 1 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

Advertisement

अमेरिका,चीन,फ्रान्स, इटली, स्पेन ,इंग्लंड, जपान या देशासह संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.केंद्रसरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घरात बसून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.जनतेने सरकारचे आदेश पाळावे कोरोना संपूर्णपणे नष्ट करावयाचा असेल तर जनतेने घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा बचाव करावा असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे. अमेरिका,चीन,फ्रान्स,इंग्लंड, स्पेन,इटलीसारखे देशसुद्धा कोरोनाच्या संक्रमण रोगासमोर हतबल झाले आहेत.आपल्या भारत देशातून कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर सर्व लोकांनी घरातच राहून प्रशासनाला मदत करावी. केंद्रसरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज जाहीर केलेले आहेत मात्र राज्यसरकार याबाबत अपयशी ठरले आहे.
राज्यसरकारने ऊसतोड कामगार भूमीहिन,शेतमजूर,गोरगरीबांसाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली.

आष्टी येथे अनाथ ,गोरगरीबांना किराणा सामान वाटप केल्यानंतर माजी आ. भीमराव धोंडे पञकारांशी बोलत होते.
राज्यसरकारने शेतमजूर, बांधकाम मजूर, ऊसतोड कामगारांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली.
राज्यसरकार जाणीवपूर्वक ऊसतोड कामगार, निराधार ,भूमीहिन व शेतमजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे.ऊसतोड कामगारांना विशेष सवलत द्यावी असे माजी आ. भीमराव धोंडे यांनी यावेळी सांगितले.आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील जे भूमिहीन निराधार मजूर आहेत अशा गोरगरीब कुटुंबीयांना त्यांनी यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.भविष्यात कोणालाही अडचण उद्भवल्यास आपण त्यासाठी सदैव तत्पर राहून मदत करू असे त्यांनी यावेळी सांगितले. मतदार संघातील काही निराधार, मजुर ,भूमीहिन व गोरगरीबांना किराणा सामान वाटप माजी आ. धोंडे यांनी केले.मतदार संघांमधील पाच पोलिस स्टेशनमधील ५० पोलीसांना कोरोनापासुन बचाव करण्यासाठी व विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विशेष पोशाखाचे वाटप करण्यात आले.केंद्रसरकारच्यावतीने गरीबांसाठी भरपुर मदत केली आहे. राज्यसरकारने गोरगरीबांसाठी मोठे पॕकेज जाहिर करावे अशी शेवटी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: