fbpx
मराठवाडाशैक्षणिक

Ashti- *स्पर्धा परिक्षेत यश संपादन करण्यासाठी जिद्द चिकाटी व परिश्रम घ्यावे-माजी आ.भीमराव धोंडे*

शेअर करा

 

आष्टी दि,16 मार्च , टीम सीएमन्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात पदवीदान वितरणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.विद्यापीठाचा हा चांगला उपक्रम आहे. पदवीनंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन
करण्यासाठी जिद्द ,चिकाटी व परिश्रम घ्यावेत. भरपुर पुस्तके वाचा आणि ज्ञानी व्हा असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथे आनंदराव धोंडे महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात
अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपप्राचार्य जेष्ठ पञकार अनंत हंबर्डे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, संस्थेचे संचालक राजाबापु नलावडे,उपप्राचार्य डॉ. भगवान वाघुले, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, प्रा.डॉ.जी.बी.मंडलिक, डॉ.भास्कर चव्हाण, डॉ.बाळासाहेब धोंडे, प्रा.पंडीत औरे, प्रा.डॉ.बापु खैरे उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाच्या गॉर्डनमधील स्व. आनंदराव धोंडे यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सर्व पदवीधर विद्यार्थी आणि प्रमुख पाहुण्यांना या वाजत गाजत व्यासपीठावर आणण्यात आले. यावेळी पुढे बोलताना माजी आ. धोंडे म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करायचे ते निश्चित करावे. आपोआप
आपल्याला काहीच मिळणार नाही. ध्येयासाठी कष्ट केले पाहिजे.जीवनात शिक्षणाचा शेवट कधीच नसतो. युवकांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यशस्वी व्हावे. आष्टी हा भाग दुष्काळी आहे. नियमित व्यायाम कशा करावा तसेच चांगला अभ्यास केल्यास जीवन सुखी होईल असेही माजी आ.धोंडे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अनंत हंबर्डे म्हणाले की, संस्थेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे हे एक दिलदार व्यक्तीमत्व आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मुंबई , दिल्लीपर्यंत पायी मोर्चे काढले. या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक पीएचडी प्राप्त आहेत हे संस्था अध्यक्षांचे भुषण आहे. व ज्ञानाचा साठा असला तरच त्या पदवीला महत्त्व आहे. पदवी म्हणजे पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाजाला विकसित करण्यासाठी पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार तेथे चांगले व नंबर एकचे काम करावे. याप्रसंगी महाविद्यालयाचा खेळाडू
कष्टातुन नावलौकिक कामगिरी केल्याबद्दल व विद्यापीठात भौतिकशास्त्र आलेल्या कांचन नन्नवरे यांचा माजी आ. भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यावर्षीपासून पदवीदान सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. १९९० मध्ये कडा येथे या महाविद्यालयाची स्थापना करून विशेष करून विद्यार्थींनींची शिक्षणाची चांगली सोय धोंडेसाहेब यांनी केल्याचे सांगीतले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.नवनाथ चौधरी यांनी केला.कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी ,प्राध्यापक ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close