ताज्या घडामोडीमराठवाडा

*आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना., शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, कहेवडगांव व मातकुळी येथील बफर झोन संपला*

शेअर करा

 

बीड, दि.१३, टीम सीएमन्यूज

जिल्ह्यातील आष्टी तालुक्या शेजारचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील कंटेनमेंट झोन (Containment Zone ) संपल्यामुळे लगत असलेल्या आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना., शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, कहेवडगांव व मातकुळे येथील लागू केलेला बफर झोन (Buffer Zone) शासनाचे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे काढून टाकण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

Advertisement

दिनांक 23 एप्रिल 2020 अन्वये आष्टी तालुक्याच्या लगत असलेल्या जामखेड जिल्हा अहमदनगर हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला होता यामुळे या गावापासून04 कि. मी. परिसरातील आष्टा ह.ना.,शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, कहे वडगाव, व मातकुळे यांचा गावाचा परिसर Buffer Zone म्हणून घोषीत करण्यात येऊन पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी आष्टा ह.ना., शिंदेवस्ती,चिंचपूर, भातोडी,कहेवड गाव, व मातकुळे याचा गावाचा परिसर Buffer Zone म्हणून घोषित करण्यात आला होता.कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता हा Buffer Zone म्हणून जाहिर झाल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत असे कळविले आहे. तरी या परिसरातील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल करण्यात येत आहे .

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: