ताज्या घडामोडीमराठवाडा

आष्टीत पत्रकारांना मेडिकल व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

आष्टीच्या 'युवा पत्रकार संघा'ने जपली सामाजिक बांधिलकी

शेअर करा

आष्टीत पत्रकारांना मेडिकल व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

Advertisement

आष्टीच्या ‘युवा पत्रकार संघा’ने जपली सामाजिक बांधिलकी

आष्टी दि,3 मे टीम सीएमन्यूज

राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून या काळामध्ये जीवाची परवा न करता रस्त्यावर उतरून माहिती संकलनाचे काम पत्रकार करत असतात. या पत्रकारांना आरोग्य विषयी मेडिकल किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आष्टी तालुका युवा पत्रकार संघ व
पनवेल येथील उद्योजक आष्टीचे भूमिपुत्र अजय कापरे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ३ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे पोलिस उपविभागीय अधिकारी विजय लगारे, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्या हस्ते सोशल डिस्टनसिंग ठेवून वाटप करण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पत्रकार हे शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून वाचकांपर्यंत माहिती पुरविण्याचे काम बातमीच्या माध्यमातून करत असतात. त्यामुळे विविध नागरिकांशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मेडिकल व जीवनावश्यक वस्तूंचे किट चे वाटप उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे व नगरपंचायतच्या मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे . कोरोनासारख्या महामारीच्या काळात वंचित घटकांना मदत देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असे प्रतिपादन नगरपंचायतच्या मुख्याधिकारी शारदा दळवी यांनी केले. यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव अविशांत कुमकर, जावेद पठाण, निसार शेख, सय्यद बबलू, जे.बी औटे, यशवंत हंबर्डे, अण्णासाहेब साबळे, संतोष तागडे, किशोर निकाळजे, तुकाराम भवर, संतोष नागरगोजे,अक्षय विधाते, संजय खंडागळे, मनोज पोकळे, सुरेश कांबळे, रतन निकाळजे, मारुती सत्रे आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: