ताज्या घडामोडी

वाळु गायब प्रकरणात आरोपीच्या सातबारावर बोजा तर पोलीस पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

शेअर करा

आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी वाळु गायब प्रकरणात आरोपीच्या सातबारावर बोजा तर पोलीस पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

आष्टी दि 26 डिसेंबर ,प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील मौजे घोंगडेवाडी येथे जप्त केलेल्या 200 ब्रास वाळु गायब प्रकरणात जबाबदार पोलीस पाटील यांच्या निलंबनाची मागणी करत दि.21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर पोलीस पाटील जनार्दन भिमराव माळशिखरे यांनी वाळूसाठा गायब झाल्यानंतर 24 तासात गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, मंडळ आधिकारी व तलाठी यांनी सुचना देऊन सुद्धा तसेच17/11/2020 रोजी कार्यालयाने पत्र देऊन सुद्धा पोलीस पाटील जनार्दन माळशिखरे यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर शासन सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव उपविभागीय आधिकारी पाटोदा यांना पाठवला असल्याचे लेखी तहसिलदार शारदा दळवी यांनी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी (गौणखनिज)विभागाला कळवले आहे.

54 लाख दंड वसूल प्रकरणात जमिनीवर बोजा चढवला आहे:- तहसिलदार शारदा दळवी
मौजे घोंगडेवाडी येथिल अनाधिकृत गौणखनिज वाळुचे नदीपात्रातुन उत्खनन करून नियंत्रण पथक कर्मचारी यांनी दि.29/04/2020 रोजी जप्त केलेला 200 ब्रास वाळु साठा पोलीस पाटील जनार्दन माळशिखरे यांच्या ताब्यात देऊन ताबा पावती करून घेतली होती.सदर प्रकरणात श्री.आनिल भिमराव माळशिखरे यांना रक्कम रूपये 54 लाख 19 हजार 20 रूपये इतकी दंडाची नोटीस बजावण्यात आली होती.सदर रक्कम वसूल होणेबाबत श्री.आनिल भिमराव माळशिखरे यांच्या नावावर असणारे सर्व सातबारा उतारा वर वरील रकमेचा बोजा दि.16/09/2020 च्या तहसिल कार्यालय आष्टी येथिल आदेशान्वये चढविण्यात आला आहे.

वाळुटेंडर सुरू करण्यासाठीच राज्यस्तरीय पर्यावरण अनुमतीसाठी पाठवला:-

वाळू टेंडर बंद असल्याने सर्व सामान्य माणसाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे वाळु टेंडर सुरू करण्यात यावेत या मागणीस्तव वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा बीड यांनी आष्टी तालुक्यातील लिलावासाठी योग्य ठरविण्यात आलेल्या1)धिर्डी 2)हिंगणी 3)खडकत या वाळुघाटाचे तालुकास्तरीय समिती मार्फत प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी बीड यांना सादर करण्यात येणार आहे, सदर वाळु घाटांना राज्यस्तरीय पर्यावरण अनुमती प्राप्त होताच सदर वाळु घाटाचे लिलाव करण्यात येतील.

वाळु तस्करी प्रकरणात महसुल व पोलीस प्रशासनावर जबाबदारी

वाळु तस्करी प्रकरणात संबधित महसूल व पोलीस प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भात आष्टी तालुक्याच्या संदर्भात अवैध वाळु उपसा व वाहतूक रोखण्याच्या दृष्टीने महसूल व पोलीस प्रशासन यांचे संयुक्तिक भरारी पथके नेमण्यात आलेली असून वाळु तस्करी आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

हेही वाचा:आणि समृद्धी वाघिणीने दिला 5 बछड्यांना जन्म;आतापर्यंत 12

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close