ताज्या घडामोडीमराठवाडा

सोमवारी आष्टी तालुक्यातील 125 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत – नायब तहसिलदार शारदा दळवी यांची माहिती

शेअर करा

सोमवारी आष्टी तालुक्यातील 125 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत – नायब तहसिलदार शारदा दळवी यांची माहिती

आष्टी दि 5 प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले असून,तालुक्यातील 125 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.7 डिसेंबर सोमवारी तहसिल कार्यालयात होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसिलदार शारदा दळवी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना नायब तहसिलदार दळवी म्हणाल्या की,मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उद्या सोमवार दि.7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृृृहात तालुक्यातील 125 ग्रामपंचायत असून,या ग्रामपंचायतच्या पुढील पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्यात येणार आहे.यातील अनु जाती सरपंच 7 महिला 6 पुरूष एकूण 13,तर अनु जमाती 2 महिला 1 पुरूष एकूण 3,नागरिकांचा मागास प्रवर्ग 17 महिला,17 पुरूष एकूण 34 असे तर सर्वसाधारणसाठी 38 महिला व 37 असे एकूण 75 या पध्दतीने तालुक्यातील 125 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण सुटणार आहे.हा सोडतीचा कार्यक्रम तहसिलदार राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीचे गांभिर्य ओळखून फिजीकल डिस्टींगचे पालन करून नागरिकांनी उपस्थितीत राहण्याचे अहवान नायब तहसिलदार शारदा दळवी यांनी सांगितले.

हेही वाचा:बिबट्या आष्टीतून थेट करमाळा तालुक्यात दाखल;फुंदेवाडीत हल्ल्यात एक ठार

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close