fbpx
क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*प्रेयसीला रस्त्यातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न;तब्बल 12 तास तरुणी मृत्यूच्या छायेत*

शेअर करा

नेकनूर दि 15 प्रतिनिधी

प्रेयसी ला रस्त्यातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न प्रियकराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील येळंब घाट येथे घडली.ही तरुणी तब्बल 12 तास मृत्यूच्या छायेत वेदना सहन करत होती.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील  शेळगाव  येथील सावित्रा,डिगंबर अंकुरवार वय 22 असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती आपल्याच गावातील तरुण अविनाश राजुरे यांच्यासोबत दुचाकीवरून  गावी जात होती. रात्री उशिरा

येळंब घाट जवळ आल्यानंतर या अविनाशने सावित्रा ला रस्त्यापासून काही दूर असलेल्या दगडाच्या खदानी कडे नेऊन  गाडीवरून खाली उतरून तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला .यावरच तो न थांबता त्याने तिच्यावर ऍसिडही टाकले .या मध्ये ही तरुणी 48 टक्के भाजली.

अशा अवस्थेत कोणाचेही लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ही तरुणी पडली होती.पहाटे दोन वाजलेपासून ते दुपारी 2 पर्यंत ही तरुणी तिथेच पडून होती .रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिला नेकनूरच्या दवाखान्यात आणि तेथून  बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर आहे.

पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून नेकनूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close