क्राईमताज्या घडामोडी

*प्रॉव्हिडंट फंडाच्या रक्कमेसाठी आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न*

शेअर करा

 

केज दि 4 ऑक्टोबर, प्रतिनिधी

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रक्कमेसाठी चक्क आपल्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील कानडीमाळी येथे घडला. आईने दिलेल्या तक्रारीवरून दोन मुला विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्यातील कानडी माळी येथील इंदुबाई लालासाहेब कुचेकर,वय 50 वर्ष यांचे पती लालासाहेब हरीभाऊ कुचेकर हे बीड जिल्हा पोलीस दलात नौकरीस होते. सन 2005 मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉस्टेबल पदी कार्यरत असताना ते अचानक बेपत्ता झाले होते.बेपत्ता झाल्याची तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात इंदुबाई यांनी दाखल केली होती. परंतु त्यांचा शोध न लागल्यामुळे सन 2013 मध्ये त्याना मयत घोषीत करण्यात आले. पतीच्या नोकरीच्या कालावधीतील प्रॉव्हिडंट फंडाची तेरा लाख चौ-याएंशी हजार रूपयाची रक्क्म इंदुबाई याना ऑगस्ट २०१८ मध्ये मिळाले असता त्यांनी या रकमेतील नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये त्यांनी संतोष व नितीनला बोलावुन घेवुन दिले.

हेही वाचा:*रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत राज्य सरकारची कार्यप्रणाली जाहीर* 

 

दिनाक ३ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी एक वाजण्याचे सुमारास संतोष व नितीन हे दोन भाऊ कानडीमाळी येथे आई राहत असलेल्या घरी येऊन पैशाची मागणी करू लागले पैसे न दिल्यास त्यांनी आई इंदुबाई यांना जीवे मारण्याची धमकी दिली असता त्यांना गावातील माणसे गोळा करून मी तुम्हाला पैसे देवुन टाकते,असे सांगितल्यावर दोघे जण निघुन गेले व सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास परत आले वडिलांच्या पीएफ चे राहिलेले पैशाची मागणी करू लागले यावेळी संतोष याच्या हातात पेट्रोलची बाटली असल्याने इंदुबाई या घरा बाहेर येऊन साबला रस्तावर उभ्या राहिल्या असता दुसरा मुलगा नितीन याने संतोषला आईच्या अंगावर पेट्रोल टाक असे म्हणत आईला आजच जीवे मारून टाकू असा म्हणाल्याने त्या भावजय रमलबाई कान्हु खाडे यांच्या घराकडे पळत जात असताना दोन्ही मुलं संतोष व नितीन हे पाठीमागे पळत येऊन त्यानी शिवाजी रघुनाथ राऊत यांच्या पाण्याच्या जारच्या दुकाना समोर रोडवर धरून संतोष याने त्याच्या हातातील बॉटलमधील पेट्रोल आईच्या अंगावर टाकले व नितीन याने काडी पेटवुन आईच्या अंगावर फेकणार तेवढ्यात गावचे सरपंच अमर सोपान राऊत यांनी नितीनच्या हातावर मारून पेटलेली काडी विझवत इंदूबाईचा जीव वाचवला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात इंदुबाई लालासाहेब कुचेकर यांच्या तक्रारी वरून संतोष लालासाहेब कुचेकर वर वय 32 वर्ष व नितीन लालासाहेब कुचेकर वय 30 वर्ष दोन्ही रा.बीड जि.बीड यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांना केज न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मिसळे यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सिध्दे करत आहेत.
यातील आरोपी मुलांना केज पोलिसांनी अटक केली असून त्यांना केज न्यालयासमोर हजर केले असता ६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close