fbpx
क्राईमताज्या घडामोडी

*उसतोडणी कामगारांची वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न;अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल*

शेअर करा

*

आष्टी दि १९ प्रतिनिधी

Advertisement

रात्रीच्या वेळी उसतोडणी कामगारांची वाहतूक  करणाऱ्या  टेम्पोचे  बोनेट आणि कॅबीन ला आग लावून जाळण्याचा अज्ञात व्यक्तींनी प्रयत्न केला.ही घटना कडा शिराळ रस्त्यावर धिरडी गावाजवळ घडली.

 उसतोडणी कामगारांचे आंदोलन हिंसक होताना आहे.उसतोडणी कराराच्या संदर्भात उसतोडणी मुकादम संघटनेने आंदोलन सुरु केले असून या आंदोलनाला हिसंक स्वरूप येत आहे.

याबाबत आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सलीम पठाण यांनी सांगितले कि, धिरडी शिवारात रात्री उशिरा १२ ते १ वाजण्याच्या सुमारास उसतोडणी मजूरांची वाहतूक करणाऱ्या  टेम्पोला अडविण्यात आले.स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गाडी आडवी लावून चालकाला धमकी दिली आणि तुला माहित नाही का उसतोडणी कामगारांचे आंदोलन सुरु आहे असे सांगून त्याला खाली उतरून टेम्पो क्रमांक MH 16 Q 6788 या टेम्पोच्या समोरील बाजू आणि कॅबिनेट पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये टेम्पोचा समोरचा भाग जळाला आहे. त्यानंतर हे व्यक्ती निघून गेले. या घटनेची मजुरांनी धास्ती घेतली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्या मजुरांची दुसऱ्या वाहनाने कारखान्याकडे रवानगी केली. यासंदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात टीन व्यक्तीविरुद्ध जाळपोळ करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं हे राज्यासमोरील आव्हान-शरद पवार 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close