ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपा अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

शेअर करा

 

धुळे दि 21 जय जाधव

बेकायदेशीरपणे वृक्ष तोडणार्‍या ठेकेदारावर आणि दुर्लक्ष करणार्‍या मनपा अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे शहर अध्यक्ष हर्षल राजेश परदेशी यांनी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापुर्वीच त्यांना महापालिकेच्या प्रवेशव्दारावर पोलिसांनी रोखत ताब्यात घेतले.
मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घेवून अनामत रक्कम भरुन आणि सबळ कारण असेल तरच वृक्ष तोडण्याची परवानगी दिली जाते. मात्र असे कारण नसतांना बेकायदेशीरपणे वृक्ष तोड केली गेली. याबद्दल तक्रार करुन कारवाईची मागणी हर्षल परदेशी यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. परंतू आठ दिवस पाठ पुरावा करुन देखील दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला. आज सोमवारी सकाळी महापालिकेच्या प्रेवश व्दारासमोर हर्षल परदेशी यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी जमले असतांना पोलिसांनी हर्षल परदेशी यांना अडवले, त्यांच्याकडील पेट्रोलची बाटली हिसकावून घेत त्यांना आत्मदहन आंदोलन करण्यापासून रोखले. तसेच ताब्यात घेतले, यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा:वळणावर झालेल्या अपघातात तलाठी गोरे यांचा मृत्यू

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close