क्राईमताज्या घडामोडी

*औरंगाबाद :कुत्र्याला दोरीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार;दोघांवर गुन्हा दाखल*

शेअर करा

 

 

महेश डागा
औरंगाबाद दि 7 जून

केरळ येथील गर्भवती हत्तीच्या घटनेनंतर कुत्र्याला दोरीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानुसार दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या अजबनगर परिसरात एका कुत्र्याला दुचाकीवर बसलेले दोन जण फरफटत नेत असल्याचा प्रकार घडला. त्यावेळी एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर श्वान प्रेमींनी या घटनेचा शोध घेत क्रांतिचौक पोलिसात याबाबत तक्रार दिली.

अवघ्या 14 सेकंदाच्या व्हिडिओत या घटनेची क्रूरता दिसून येते. दुचाकीवर दोन जण वेगात जात आहेत. मागील मागे बसलेल्या इसमाचा हातात साखळी असून त्या साखळीच्या माध्यमातून एका कुत्र्याला ओढत नेले जात आहे. कुत्रा त्रास होत असल्याने ओरडत आहे. मात्र दुचाकीवरील व्यक्ती निर्दयी पणे त्याला ओढून नेत आहे. या व्हिडिओत कुत्र्याला दिलेला त्रास पाहून श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला. पुष्कर शिंदे, अनुज धुप्पड, अमृता दौलताबादकर, रोहित नांदूरकर, अनुप मावलवार आणि पौर्णिमा पंजाबी या श्वान प्रेमींनी हा घटनेचा शोध घेतला. व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतल्यावर अजबनगर येथे शुक्रवारी सायंकाळी हा व्हिडिओ तयार काढल्याचे त्याने सांगितलं. त्यानुसार श्वानप्रेमींनी क्रांतिचौक पोलिसात तक्रारी नोंदवली. त्यानुसार दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: