आरोग्यताज्या घडामोडी

Beed- *जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कोरोना ला हरविण्यासाठी या आपत्तीमध्ये धर्म भाव विसरून एकत्र येण्याचे आवाहन*

शेअर करा

बीड दि.16 मार्च, टीम सीएमन्यूज

कोरोना विषाणूच्या आजारा सोबत सुरू असलेल्या या लढाईत तुम्ही सर्व माझे सोबती आहात. सगळ्यांच्या सहकार्यातून या संसर्गाच्या साथीला जिल्ह्यात येण्यापासून आपण रोखणार आहोत. आपण काय करणार आहोत हे आत्ताच ठरविणे गरजेचे आहे . यामध्ये होणारा उशीरा मुळे किती तरी जणांचं जीव जाऊ शकतो असे सांगताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, या मध्ये आपल्या परिवारातील व्यक्ती देखील असू शकते , त्यांना सुरक्षित करणे गरजेचे आहे .या पवित्र कार्यामध्ये योगदान देणे गरजेचे असून यामध्ये कोणतेही धर्म जात असा भेदभाव नाही …. माणुसकी हिच महत्त्वाचे आहे….( कोरोना के साथ इस संघर्ष मे हमे आजही है ये तय करना है इसमे देेरी से कितनोंकी जान जा सकती है….. इस नेक कामे कोई धर्म जात नाही सिर्फ इन्सानियत ही एक है) असे भावपूर्ण आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रसंगी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .अशोक थोरात यांच्यासह जिल्हाभरातून आलेले मौलवी, विश्वस्त पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी संवेदनशील होत जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की , कोरोना संसर्गाचे गांभीर्य ओळखून या संसर्गाला आपल्या घरात येण्यापासून रोखावे . हे पाऊल उचलण्यासाठी मज्जिद मंदिर आदी धार्मिक ठिकाणांवर एकावेळी पाच ते दहा व्यक्तींपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. आपल्या परिवार, समाज आणि शहराला सुरक्षित करण्यासाठी गर्दी करण्यापासून दूर राहावे . शासन व प्रशासनाचे कोरोना विषाणूचा संसर्गाला रोखणे हेच प्राधान्य आहे .
ते पुढे म्हणाले , कोरोना या संसगजन्य या आजारात घाबरण्याचे कोणतेही कारण नसून प्रशासन यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे परंतु याबरोबरच आपण स्वतः या प्रयत्नांना साथ देऊन व मिळालेल्या सूचनांचे व आरोग्यविषयक माहितीचे पालन करून
बचाव करू शकतो असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला.
त्यांनी सांगितले , यासाठी आपण आपला नमाज अथवा प्रार्थना मंदिर व मस्जिद मध्ये न जाता घरीच पूर्ण करावे मंदिर, मस्जिद मध्ये एकावेळी पाच ते दहा व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी करु नये. आपल्या परिसरात गल्ली मोहल्ल्यामध्ये कोणीही व्यक्ती परदेशी प्रवास करून आली असल्यास त्याची माहिती त्याने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन द्यावी आणि आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात असे त्यांना सांगावे असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पोद्दार म्हणाले, कोरोना साथीच्या या शत्रूला आपणाला हरवायचे आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आपण जोपर्यंत यासाठी पुढे येत नाही तोपर्यंत कोणीही या आजारात तुम्हाला 100% सुरक्षित करू शकत नाही, यावेळी फक्त शरीयत आणि सेहत विषय नसून …. जीवनाचा विषय आहे, असे श्री पोद्दार म्हणाले.
*इस लढाई मे मुक्कमल तौर पे हम प्रशासनके साथ रहेंगे*
यावेळी जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या मौलवींनी आपले विचार व्यक्त केले तसेच आपल्या शंका बोलून दाखवल्या. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी पूर्ण सहकार्य देण्याचे भावना बोलून दाखविली
इस लढाई मे मुक्कमल तौर पे हम आपके साथ रहेंगे , ये संसर्गजन्य साथ कितनों की जान का मसला है !
हम लोगों को इस बारेमे वाकीफ करायेंगे ,
जिंदगी खतरेमे है , ऊस खतरेको दूर करना है l
अशा भावना त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी डॉ अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड , परळी-वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश देशमुख, जमियात उलमा , मौलाना इकराम, मुफ्ती असपाक, सलीम जहांगिर , अॅड शेख शफी, अॅड. ख्वाजा , मुफ्ती् आरिफ अशा अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी परळी वैजनाथ मंदिर देवस्थानचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी देखील प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल तसेच भाविकांना 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी न येण्याचे आवाहन केले जाईल मंदिरामध्ये फक्त नियमित पूजा व आरती सुरू राहील असे सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close