ब्रेकिंग न्यूज

*Beed-पाच रेशन दुकानाचे परवाने निलंबित*

जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई

शेअर करा

 

बीड दि 12 ,एप्रिल टीम सीएम न्यूज

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता अशा परिस्थितीचा फायदा रेशन दुकानदार घेत असल्याचे पुढे आले आहे .यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .त्यानुसार या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी बीड तालुक्यातील एकूण पाच रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित केले आहे.
सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे. तरी अश्या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही रास्त भाव दुकानदार दुकान उघडत नाही, धान्य नियमाप्रमाणे न देता कमी प्रमाणात देतात, ई-पोस मशीनची पावती देत नाही, शासनमान्य रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतात, धान्य देत नाही, ग्राहकांची अडवणूक करतात, ग्राहांकासह अरेरावीची भाषा वापरतात अश्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या .
या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी बीड तालुक्यातील एकूण पाच रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित केले असून निलंबित दुकाने नजीकच्या चांगल्या दुकानाला जोडण्यात येणार आहेत. निलंबित करण्यात आलेली दुकाने पुढील प्रमाणे 1. रमेश सीताराम गंगाधर – बीड- 2. ज्ञानदेव कान्हू बांड – घोसापुरी
3. चंद्रकांत रामभाऊ फाटले – बीड
4. चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन – बीड-
5. चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन – बीड-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close