ताज्या घडामोडी

Beed- *माजी आ.संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यानं अटकपूर्व जामीन मंजूर*

शेअर करा

 

केज ,दि 20  टीमसीएम न्यु्ज
केज येथील स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे मा.सहकारी सूत गिरणी मध्ये फिर्यादीच्या बनावट सह्या करून प्रस्ताव तयार केल्या प्रकरणी माजी आ. संगीता ठोंबरे व सूतगिरणीचे चेअरमन डॉ विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मा.आ.संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांना अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचल्यावर वप्रत्येकी २५ हजार रुपये केज न्यायालयात जमा करण्याच्या हमीवर अटक पूर्व जमीन मंजूर केला आहे

केज येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीचे तत्कालीन संचालक गणपती कांबळे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्षा आमदार प्रा सौ संगीता ठोंबरे व चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या या सह्या करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्यात आले आहे. सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा श्रीमती आश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडून सूतगिरणीचे चेअरमन व आमदार यांच्या वर १५३/३ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केज न्यायालयात याचिका दाखल करून केली होती या याचिकेवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होत सूतगिरणीचे चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे व केज च्या आमदार संगिता ठोंबरे यांच्या विरोधात कलम ४२० , ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल करण्याचे मा. न्यायालयाने १५६ /३ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करून चार्जशीट दाखल करून चार्जशीट दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्या. थोरात मँडम यांनी दिले होते न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी केज मतदारसंघाच्या आमदार प्रा सौ संगीता ठोंबरे व लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे मागासवर्गीय सूत गिरणी चे चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 410 / 19 गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी ऍड अशोक ससाणे यांच्या मार्फत माजी आ.संगीता ठोंबरे व सूतगिरणीचे चेअरमन डॉ विजयप्रकाश ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणे करिता अर्ज दाखल केला होता त्या अर्जाची सुनावणी होऊन व दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून मा.सत्र न्यायाधीश सपटणेकर मॅडम यांनी दिनांक २० मार्च रोजी माजी आ संगीता ठोंबरे व सूतगिरणीचे चेअरमन डॉ विजयप्रकाश ठोंबरे याना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचल्यावर व प्रत्येकी २५ हजार रुपये केज न्यायालयात जमा करण्याच्या हमीवर अटक पूर्व जमीन मंजूर केला आहे ठोंबरे दाम्पत्याच्या वतीने ऍड अशोक ससाणे यांनी काम पहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close