ताज्या घडामोडी

Beed *बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणारे 14 जण लॉकअप मध्ये*

शेअर करा

बीड दि 4 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

Advertisement

पाच दिवसात 10 गुन्हे दाखल
14 लोक अटकेत

एकीकडे देश ,समाज कोविड 19 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना अनेक जातीय तेढ निर्माण करणारे लोक याचा फायदा घेत आहेत .व्हाट्स अँप च्या माध्यमातून हे जातीयवादी लोक हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करत आहेत .गेल्या पाच दिवसात 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून 14 लोकांना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली .

बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे समाजातील निर्माण करणारे काही लोक आहेत त्यांच्या विरुद्ध बीड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून यापुढे सामाजिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीबरोबर त्या व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिन वर ही कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून देशांमध्ये आणि राज्यांमध्ये covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशा स्थितीत निजामुद्दीन येथील मरकस प्रकरणाचा आधार घेऊन नागरिक विविध व्हाट्सअप ग्रुप वर हिंदू-मुस्लीम यांच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे बीड पोलिसांनी पाच दिवसांमध्ये दहा गुन्हे दाखल केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 505 ( 2), 295 अ,153 अ याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षाची शिक्षा असल्याचेही पोलिस अधिक्षक हर्ष पोतदार यांनी सांगितले.

त्यांनी व्हाट्सअप च्या एडमिन ला आव्हान केले आहे की सध्या 144 कलम लागू केले करण्यात आले आहे. त्यामुळे जर अशा प्रकारच्या पोस्ट कुठल्याही व्हाट्सअप ग्रुप वर जरा आढळून आल्या तर ती पोस्ट टाकणाऱ्या संबंधित व्यक्ती विरुद्ध आणि त्या व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिन विरुद्ध ही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सर्व ग्रुपच्या ऍडमिनने ऍडमिन सेटिंग करून आपल्या ग्रुपमध्ये येणाऱ्या पोस्टवर कंट्रोल करण्याची भूमिका घ्यावी असेही त्यांनी आवाहन केले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: