ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*

शेअर करा

 

आष्टी दि,17 मे टीम सीएमन्यूज

आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे पाहुणे म्हणून आलेल्या त्या सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली .
मूळचे नगर जिल्ह्यातले असलेले हे पाहुणे काही दिवसापूर्वी पाटण सांगवी नातेवाईकांकडे आले होते. त्यातील एका वृद्ध व्यक्तीला खोकल्याचा आणि सर्दीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले होते मात्र या रुग्णालयाने दाखल न करून घेतल्याने त्यांना बीड येथे रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
त्यांचे स्वाब आज पॉझिटिव्ह आले त्यामुळे आष्टी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आठ झाली आहे .

बीड जिल्ह्यात दोन करून बाधित रुग्णांची संख्या आढळून आल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये तोडणी कामगारांची संख्या सर्वाधिक आहे.
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे एका कुटुंबांमध्ये यातून काही नातेवाईक आले होते. या पाहुण्या पैकी एका ला सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता.
त्यामुळे त्यांच्या घशाचे स्वाब घेण्यासाठी त्यांना आरोग्य विभागामार्फत अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र या रुग्णालयांमध्ये संबंधित रुग्ण हे बीड जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना पुन्हा बीड जिल्ह्यात पाठवण्यात आले होते .ते पॉझिटिव्ह आल्याने आणखी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत .

Advertisement
Tags

Related Articles

3 Comments

  1. ऊस तोड कामगाराचा सदर बातमीत उल्लेख करण्यात आला आहे, तो चुकीचा आहे. कारण कोणत्याही ऊस तोड कामगाराला कोरोना झालेला नाही. जे लोक कोरोना बाधित बाधित आहेत ते सर्व बिन कामी बाजार बुणगे आहेत. ऊस तोड कामगार गरीब, कष्टाळू आणि इमानदार आहे. त्यांचा बाजार बुंग्याबरोबर उल्लेख करू नये

  2. प्रशासनाची फसवणूक करून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा कडेलोट करण्यात यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: