fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

Beed-ashti-copy- *जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रयत्नाने पहिल्यांदा आष्टी तालुक्यात कॉपीला पायबंद*

शेअर करा

 

आष्टी दि .3फेब्रुवारी,।टीम सीएमन्यूज

Advertisement

स्थळ: गहुखेल, तालुका आष्टी.
प्रसंग :इयत्ता दहावीच्या परीक्षेची घंटा वाजते,रंगीबेरंगी कपड्यातील आणि विविध शालेय गणवेश असलेले विद्यार्थी आपापल्या परीक्षा दालनात जाऊन बसतात,परिसरात शांतता पसरते ते तब्बल तीन.आणि तासाची घंटा वाजते आणि मुले भराभर बाहेर पडतात.
     तीन तासाची निरव शांतता चक्क आष्टी तालुक्यातील विविध दहावी परीक्षा केंद्रावर पहिल्यांदाच पहावयास मिळाली .हे सर्व घडले ते तरुण तडफदार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रयत्नाने.
बीड पासून 100 किमी अंतरावरील दहावीच्या परीक्षा केंद्राची आज ही अवस्था पहावयास मिळाली . कधी काळी गहुखेल दहावी केंद्रावर दहावीची परीक्षा म्हणजे बाजार असायचा,आज मात्र विरुद्ध चित्र पहावयास मिळाले.

आष्टी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी हे चित्र आशादायक म्हणायला हवे.असेच चित्र तालुक्यातील इतर केंद्रावर पण पाहावयास मिळाले .

      या केंद्रावर असणारा पोलिसांचा बंदोबस्त,केंद्राच्या खिडक्यांना बसविलेल्या जाळ्या, केंद्रावर बसविलेले cctv कॅमेरे यामुळे कॉपी पुरविण्याचे आणि गर्दी करण्याचे अनेकांनी टाळले.परिक्षेसंदर्भात केलेल्या उपाय योजनामूळे परीक्षेचा नूर पालाटल्याचे दिसत आहे .
     राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा आज मंगळवार दि.३ पासून आष्टी तालुक्यात सुरु झाल्या असून पहिल्यांदाच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
आष्टी तालुका हा कॉपीमुळे राज्यात ‘आष्टी पॅटर्न’ या नावाने गेल्या अनेक वर्षापासून गाजलेला आहे. परंतु यावर्षी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी योग्य नियोजन व तगडा बंदोबस्त लावल्याने या वर्षी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होत असल्याचे चित्र पहिल्या पेपरला आष्टी तालुक्यात दिसून आले .

   प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॉपी रोखण्यासाठी अनेक उपाय राबवले गेले आहेत. पहिल्यांदाच दहावीच्या परीक्षेला पर्यवेक्षक हे इतर शाळेमधील असल्याने कॉपीला आळा बसलेला आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर खिडक्याला जाळ्या व आत मध्ये प्रवेश करताना गेटवर तगडा बंदोबस्त असल्याने कॉपी पुरविणारे केंद्राकडे फिरकले नाहीत.शिवाय कॉपी देणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याचे कॉपीच्या भानगडीत कुणी पडलेच नाही. दरवर्षी परीक्षा केंद्रावर दिसणारा गर्दीचा घोळका यावर्षी कुठेही दिसला नाही, आष्टी तालुक्यातील एकही परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी दिसली नाही.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close