ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
Trending

*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*

शेअर करा

 

आष्टी दि,18 मे टीम सीएमन्यूज

बीड येथे नव्याने आढळून आलेल्या सात कोरोना बाधित रुग्णापैकी एका 65 वर्षीय महिलेचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली ,उर्वरित सहा बधितांवर उपचार सुरू आहेत .ही सर्व बाधित
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे मुंबईहून पाहुणे म्हणून आले होते .
मुंबई येथील सात व्यक्ती काही दिवसापूर्वी पाटण सांगवी नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना काल बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्यानं बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या एक झाली आहे .तर आठ जण उपचार घेत आहेत .

Advertisement
Tags

Related Articles

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: