क्राईममराठवाडा

Beed-ashti-crime – *आष्टी येथे न्यूज पेपर विक्रेते गुरव यांच्या खानावळीत चोरी*

शेअर करा

आष्टी दि 9 मार्च । टीम सीएम न्युज

Advertisement

येथील मुर्शदपुर भागातील माऊली मंदिर रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी भोजनालयात शनिवारच्या रात्री चोरीचा प्रकार घडला असल्याचे उघडकीस आले यासंदर्भात जोगेश्वरी न्युज पेपर विक्रेते व आष्टी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भीमराव गुरव यांनी चोरी झाल्याची तक्रार आष्टी स्टेशन येथे दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मंगरूळ रस्त्यावर माऊली मंदिर शेजारी भीमराव गुरव यांचे जोगेश्वरी भोजनालयात आहे .या भोजनालयातून शनिवार दि.७ मार्च रोजी रात्री शटरचे कुलूप तोडून २० हजार रुपये रोख रक्कम, दाळीचे दोन कट्टे,म्युझिक होम थेटर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असे चोरी गेल्याची तक्रार गुरव यांनी आष्टी पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
आष्टीतील चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे . आठवडाभरापासून आष्टी शहरात व मुर्शदपुर भागात दिवसाढवळ्या होत असलेल्या
चोरीचे सत्र चालूच असल्याने पोलीस या चोरीच्या तपासाकडे लक्ष देत नसल्याचा नागरिकाचा आरोप आहे याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: