क्राईमताज्या घडामोडी

Beed-ashti-crime- *पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीस जिवे ठार मारणाऱ्या पतीस आजन्म कारावासाची शिक्षा*

शेअर करा

 

आष्टी दि .3 फेब्रुवारी।टीम सीएमन्यूज

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या कारणाने आरोपी
शरद ऊर्फ दत्तू नामदेव लगड, वय-32 , रा. हिवरा, ता.आष्टी, जि.बीड यास बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय ४ थे, श्री राजेंद्र व्ही. हुद्दार आजन्म सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत ची माहिती अशी की  अशी की, डिसेंबर 2017 मध्ये आष्टी तालुक्यातील  हिवरा शिवारात  पिंपळाच्या मळ्यात आरोपी  शरद ऊर्फ दत्तू नामदेव लगड, वय-32 , रा. हिवरा, ता.आष्टी, जि.बीड याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दगडाने मारहाण करून जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह कापसाच्या पळाटीवर टाकून पळाटीला आग लावून पळाटी पेटवून दिली. संबंधित  आरोपीने खुन केल्याचा अपराध लपविण्याकरीता पत्नी घरातून निघून गेल्याचा खोटा बनाव करून तशी खोटी माहिती पत्नीच्या वडीलांस दिली . आरोपीताच्या वागणुकीचा मयत हिच्या वडीलास संशय आल्याने ते मुलीच्या सासरी आले तेंव्हा त्यांना पिंपळाच्या मळ्यात मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळुन आला.  जावायानेच मुलीचा खुन केला असल्याची खात्री पटल्याने त्यांनी फिर्याद पोलीस ठाणे अंभोरा येथे नोंदविली.
दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे अंभोरा येथे गु.र.नं.316/2017 कलम 302,201 भादंवि
अन्वये गुन्हा नोंद होवून गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक वाय. व्ही. बारवकर यांनी केला. आरोपीताविरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्यामुळे तपासीक अधिकारी यांनी अंतीम दोषारोपपत्र मा. न्यायालयास सादर केले. प्रकरणाची सुनावणी बीड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालय 4 थे, श्री राजेंद्र व्ही. हुद्दार यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती दिसून आलेल्या सबळ पुराव्याचा अधारावर मा.न्यायालयाने आरोपीतास कलम 302, 201 भादंवि अंतर्गत दोषी धरून
आरोपीतास आजन्म सश्रम करावास व 20,000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. नमुद प्रकरणात सरकारी पक्षाची बाजु सहा. सरकारी वकील ए . बी. तिडके यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close