ताज्या घडामोडीशैक्षणिक

Beed-ashti-exam- *कॉपीमुक्ती साठी 17 केंद्रावर 170 कर्मचारी*

शेअर करा

 

आष्टी दि 9 मार्च ।टीमसीएम न्यूज

इयत्ता दहावीचा सोमवारी होणारा इंग्रजी विषयाचा पेपर कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात व्हावा आणि स्थानिक नागरिकांचा परीक्षेतील सहभाग कमी व्हावा यासाठी कॉपीमुक्त परीक्षा सुरू आहेत .इंगजी विषयासाठी आष्टी तालुक्यातील सर्वच केंद्रावर 17 अधिकाऱ्यांसह 150 कर्मचारी तैनात असणार आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या नियोजनानाने
बीड जिल्ह्यातील इंग्रजी विषयाच्या परीक्षेसाठी
कडेकोट नियोजन करण्यात आले आहे त्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे .
इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी मोठ्या प्रमाणात पथकात नियोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील दोन परिरक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आलेले आहे या बैठे पथकामध्ये पंचायत समिती कर्मचारी ,पशुसंवर्धन विभाग तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षा हातात घेतल्यामुळे नियोजन करून कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा घेतल्या जात आहे. परीक्षा केंद्रावर एक अधिकारी आणि त्यांच्या समवेत दहा इतर कर्मचारी मध्ये असणार आहेत या व्यतिरिक्त शिक्षण विभागाची भरारी पथके आणि महसूल विभागाची भरारी पथके यांचाही समावेश यामध्ये आहे इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू झाल्यापासून आष्टी तालुक्यामध्ये अनेक परीक्षा केंद्रावर भयमुक्त परीक्षा सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेमुळे जिल्ह्यामध्ये नव्याने रेखावार पॅटर्न तयार होत आहे .या कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात होत असलेल्या परीक्षांचे पालकांमधून मोठे कौतुक होत आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: