ताज्या घडामोडीमराठवाडा आणि विदर्भ

*आठ दिवसासाठी बीड बंद, संपूर्ण संचारबंदी*

शेअर करा

 

बीड दि 1 जुलै टीमसीएम न्यूज

बीड जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधितांची भर पडली.त्यांचा अनेक ठिकाणी संपर्क आला होता.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढील आठ दिवस म्हणजेच 9 जुलै पर्यंत बीड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे .शहरातील महसूल, पोलीस,ग्रामविकास, नगरविकास,कृषी आणि आरोग्य या विभागातील अधिकारी कर्मचारी वगळता इतर सर्व कार्यालये बंद राहणार आहेत.शहरातील अत्यावश्यक सेवा ह्या घरपोच असणार असून खाजगी दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
आरोग्याच्या कारणाशिवाय शहरातून बाहेर जाण्यासाठी आणि बीड मध्ये प्रवेश करण्यासाठी पास मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर चार बरे झालेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
बीड जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधितांची भर पडली हे तिघेही बीड शहरातील आहेत . अजीजपुरा भागातील 29 वर्षे महिला,जुना बाजार भागातील 48 वर्षे पुरूष आणि कारंजा रोड भागातील 66 वर्षे महिलेचा समावेश आहे .

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close