आरोग्यताज्या घडामोडी

Beed-corona- *अफवांवर विश्वास न ठेवता आणि नागरिकांनी काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

शेअर करा

 

बीड दि 12 मार्च । टीम सीएमन्यूज

करोना व्हायरसच्या संदर्भात सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता आणि नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले .

 

 

“कोरोना वायरस या संसर्गजन्य आजारावरील नियंत्रण व उपाययोजना” विषयावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार व उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी या संदर्भातील उपाययोजना करण्याचे नागरिकांना आवाहन केले .
नागरिकांनी गर्दी न करता साधारण तीन ते साडेतीन फूट अंतर ठेवावे .
सर्दी खोकला अंगदुखी यासारखी लक्षणे दिसल्यास बाहेर पडू नये .तसेच परदेशी प्रवास करून आलेल्या लोकांचा संपर्क टाळावा. सर्वसामान्य लोकांना मास्क लावण्याची सध्यातरी गरज नाही.तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांनी या मास्क चा वापर करावा. यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोना व्हायरसच्या लक्षणे संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यायला हवी .त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी आपल्या खिशात अथवा आपल्याजवळ स्वच्छ रुमाल बाळगावा जेणेकरून खोकला किंवा शिंक आल्यास त्याचा इतरांना संसर्ग होणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी अंगणवाडी, नळ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी हँडवॉश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी पंधरा दिवसांमध्ये शासनाचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना व्हायरसच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून यासंदर्भात जिल्हा रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष , औषधोपचार तसेच वैद्यकीय पथक याची तयारी करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले हा संसर्ग जंतू मधून होत असल्यामुळे नागरिकांनी हँड वॉश चा वापर करून हात स्वच्छ धुण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close